अजय देवगणच्या आधी काजोलला आवडायचा ‘हा’ अभिनेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री काजोल व अभिनेता अजय देवगण हे बॉलिवूडमधील एक परफेक्ट कपल म्हणून ओळखले जातात. 1994 ला आलेल्या गुंडाराज या चित्रपटाच्या सेटवर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले व 1999 ला त्यांनी लग्न केले. मात्र अजयच्या प्रेमात पडण्याआधी काजोलला अभिनेता अक्षय कुमार प्रचंड आवडायचा व त्याच्यामागे ती दिवानी झाली होती. काजोलचा खास मित्र करण जोहर याने एका कार्यक्रमात याबद्दल सांगितले आहे.

akshay-kumar-1

काजोल व करण हे दोघे नुकतेच द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात येऊन गेले. यावेळी त्या दोघांच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली हे सांगताना करणने काजोलला अक्षय कुमार खूप आवडायचा अशी तिची पोलखोल केली. ‘ऋषी कपूर यांच्या हिना या चित्रपटाची प्रिमियर पार्टी होती. त्या पार्टीला अक्षय कुमार देखील येणार होता. त्यावेळी काजोलला अक्षय कुमार खूप आवडायचा व ती संपूर्ण पार्टीत त्याला शोधत फिरत होती. मी देखील तिला मदत करत तिच्यासोबत फिरत होता. त्या पार्टित आम्हाला अक्षय तर दिसला नाही. मात्र आम्हाला एकमेकांमध्ये चांगले मित्र मिळाले’, असे करणने यावेळी सांगितले.