
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
कामाच्या ठिकाणी होणार्या लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी गुगल कंपनीने आपल्या कर्मचार्यांसाठी विशेष वेबसाईट लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेबसाइटवर गैरवर्तनाबाबतच्या तक्रारी सोप्या पद्धतीने करता येणार आहेत. गुगलच्या कर्मचार्यांना त्यांच्या अडचणी थेट आणि सोप्या पद्धतीने मांडता याव्यात यासाठी नवी वेबसाइट तयार केल्याचे गुगलच्या डाइव्हर्सिटी, इक्विटि एंड इंव्ल्युजन विभागाच्या ग्लोबल डायरेक्टर मिलोनी पार्कर यांनी सांगितले. ही वेबसाइट जून महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जगभरातील जकळपास वीस हजार गुगल कर्मचार्यांनी कामाच्या ठिकाणी होणार्या गैरवर्तनावरून आंदोलन केले होते. त्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी, लैंगिक छळ आणि हिंसा याबाबतच्या तक्रारींबाबत कंपनी ठोस पाऊल उचले जाईल अशी घोषणा केली होती.






















































