
सामना ऑनलाईन । मुंबई
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हणुमंतराव डोळस (वय 58) यांचे आज मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून पोटाच्या कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
माळशिरस मतदारसंघातून 2009 मध्ये डोळस यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. 2014 मध्ये ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांनी चर्मकार महामंडळ आणि म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काही वर्षे काम केले होते. त्यांच्या निधनामुळे एका चांगल्या नेत्याला मुकलो अशी भावना त्यांच्या गावातील लोकांनी बोलून दाखवली. हणुमंतराव डोळस यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे.






















































