
सामना ऑनलाईन । लखीमपुर
काँग्रेसच्या डीएनए मध्येच खोटेपणा आहे अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये ते बोलत होते. काँग्रेसवाले म्हणतात की न्याय करणार पण त्यांनी नेहमीच अन्याय केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
योगी म्हणाले की, खोटेपणा हा काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे, ते न्याय करण्याची भाषा करतात ज्यांनी नेहमीच अन्याय केला आहे. भाजप सरकारमध्ये दलाली नाही. योजनेचे सर्व पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले जातात.’’ जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा पाकिस्तान जवानांचे मुंडके कापून नेत होते, आता जेव्हा जवान शहीद होतात तेव्हा पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेतला जातो असेही योगी म्हणाले.




























































