दोनशे वर्षांत प्रथमच जपानच्या सम्राटाने गादी सोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । टोकियो

200 वर्षांत प्रथमच एखाद्या सम्राटाने स्वतःच्या मर्जीने सम्राटपट सोडण्याची घटना घडली आहे. जपानचे सम्राट अकिहितो (85) यांनी सम्राटाची गादी सोडली आहे. अकिहितो ‘आपला राजमुकुट मोठा मुलगा नारुहितो (59) यांच्याकडे सोपवणार आहेत. बुधवारी एका खास समारंभात नारुहितो सम्राटाचे पद स्वीकारतील. त्यानंतर जपानमध्ये ‘रेईवा’ नावाचे नवे राजयुग सुरू होणार आहे. रेईवा हे राजयुग नारुहितो यांच्या कार्यकाळापर्यंत राहणार आहे. मंगळवारी सम्राट अकिहितो हे पारंपरिक पेहरावात मंदिरांमध्ये पोहोचले. मंदिरात त्यांनी आपले पूर्वज आणि आपल्या देवता यांना पदत्याग करत असल्याचे सांगितले. तब्बेतीच्या कारणामुळे त्यांनी सम्राट पद सोडत असल्याचे सांगितले.