एफआरपी थकीत प्रकरणी जय महेश साखर कारखान्यास सील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुधीर नागापुरे । माजलगाव

माजलगाव येथील एन.एस.एल. ग्रुपच्या जय महेश खासगी साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या गाळप झालेल्या उसाची एफआरपी न दिल्याने तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी मंगळवारी कारखान्याला सील ठोकले.

जयमहेश साखर कारखान्याने यंदा 7 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गाळप केलेल्या उसाची एफआरपी गाळप झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात यावी असा नियम असताना देखील त्यापेक्षा अधिक काळ होऊन गेला असताना कारखान्याने शेतकऱ्यांना एफ आर पी देऊ केली नाही. एफ आर पी देण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र होके यांनी वेळोवेळी या प्रकरणी वेगवेगळे आंदोलन करून साखर आयुक्त पुणे यांच्याकडे आंदोलन केल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन कारखान्याच्या गेटला शेतकऱ्यांसह टाळे ठोकण्याचे आंदोलन छेडण्याचे निवेदन देऊ केले होते. त्यावर जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे यांना याप्रकरणी प्राधिकृत केले होते. गोरे यांनी मंगळवारीकारखान्याला सील ठोकत शासनाच्या ताब्यात घेतला.

जय महेश साखर कारखान्याकडे 30 जानेवारी पर्यंत अंदाजे चार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी असून पुढील तीन महिन्यांनी बाकी शेतकऱ्याचे कारखान्याकडे शिल्लक आहेत. सदरील रकमेला ऊस नियंत्रण आदेश 1966 चे कलम 3(A) नुसार रक्कमेवर 15 टक्के दराने होणारे व्याज कारखान्याकडून जमीन महसूल ची थकबाकी समजून कारखान्याच्या मालमत्तेची जप्ती करून त्याची विहित पद्धतीने विजरी करून संबंधितांना अदा करण्यासाठी जप्ती करण्यात आली आहे.