सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; मुलींचा दबदबा; टॉपर्सच्या यादीतून मुंबई गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात मुलींचाच दबदबा असून देशभरात पहिल्या तीन क्रमांकावर मुलीच झळकल्या आहेत. तसेच उत्तीर्णतेचे प्रमाणही मुलांपेक्षा मुलींचेच अधिक आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी हे दिल्ली विभागातील असून महाराष्ट्र विशेष करून मुंबईतील एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकलेला नाही.

सीबीएसईचा बारावीचा एकूण निकाल 83.4 टक्के लागला असून या निकालात त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली आहे. या विभागाचा निकाल सर्वाधिक 98.20 टक्के लागला आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल 92.93 टक्के इतका लागला आहे. 91.87 टक्के निकालासह दिल्ली विभागाने तिसरे स्थान पटाकावले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा सीबीएसई बोर्डाने लवकर परीक्षा घेतल्या होत्या. त्यामुळे दरवर्षी मे अखेरीस जाहीर होणारा निकालही यंदा मेच्या पहिल्याच आठवडय़ात जाहीर करण्यात आला.

यंदा या परीक्षेला एकूण 12 लाख 5 हजार 484 विद्यार्थी बसले होते. यात 7 लाख 48 हजार 498 मुले तर 5 लाख 38 हजार 861 मुलींचा समावेश होता. यापैकी 10 लाख 5 हजार 427 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 9 टक्क्यांनी अधिक आहे. परीक्षेत 94 हजार 299 विद्यार्थ्यांना 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असून 17 हजार 693 विद्यार्थी 95 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे आहेत.

 यंदा 28 ट्रान्सजेंडर विद्यार्थी; 1 कोटी 70 लाख उत्तरपत्रिका

सीबीएसई बोर्डाच्या यंदाच्या परीक्षेत 28 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 83.3 इतकी असून ती मुलांपेक्षा अधिक आहे. सीबीएसईने यंदा 1 कोटी 70 लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे काम केले आहे. या उत्तरपत्रिका एकूण 3 हजार तपासणी केंद्रांकर तपासल्या गेल्या. एक शिक्षक दिकसाला जकळजकळ 25 उत्तरपत्रिका तपासत होता. परीक्षेत सर्काधिक 33 लाख 86 हजार 613 विद्यार्थी उत्तर प्रदेशातील होते.

एकूण निकाल 83.4क

  • मुली 88.7
  • मुले 79.40
  • ट्रान्सजेंडर 83.3

 विभागनिहाय निकाल

  • त्रिवेंद्रम 98.2
  • चेन्नई 92.93
  • दिल्ली 91.87

केंद्रीय विद्यालयाचा निकाल सर्वाधिक

सीबीएसई बोर्डाच्या केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिक 98.54 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे सरकारी अनुदानित शाळांचा निकाल 88.49 तर खासगी शाळांचा निकाल 82.59 टक्के इतका लागला आहे.

तिसरा क्रमांक पटकावणाऱया 18 विद्यार्थ्यांमध्ये 11 मुली

गाझियाबाद येथील दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी हंसिका शुक्ला आणि मुजफ्फरनगर येथील एस. डी. पब्लिक स्कूलची करिश्मा अरोराने 500 पैकी 499 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तीन विद्यार्थिनींनी दुसरा क्रमांक पटकावला असून हृषीकेश येथील गौरांगी चाकला, रायबरेलीची ऐश्वर्या आणि हरियाणा येथील भाव्याला 498 गुण मिळाले आहेत. तिसरा क्रमांक पटकावणाऱया 18 विद्यार्थ्यांमध्ये 11 मुलींचा समावेश आहे हे विशेष. पहिल्या तीन क्रमांकांमध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थ्याचा समावेश नसून चेन्नई विभागातील जी. कार्तिक बालाजीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

  • निकालाच्या पार्श्वभूमीवर 2 ते 16 मे दरम्यान दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन; हेल्पलाइन क्रमांक 1800 11 8004.
  • गुण पडताळणीसाठी 4 ते 8 मेपर्यंत अर्ज करता येणार.
  • उत्तरपत्रिकेच्या फोटो कॉपीसाठी 20 ते 21 मेपर्यंत अर्ज करता येणार.

सीबीएसई दहावीचा निकाल 5 मे रोजी

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार असून विद्यार्थी www.result.nic.in, www.cbseresult.nic.in, www.cbse.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.

स्मृती इराणींच्या मुलाला 94 टक्के, तर केजरीवालांच्या मुलाला 96 टक्के

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहर 94 टक्के तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित 96. 4 टक्के गुण मिळवून पास झाले आहेत. स्मृती इराणी आणि केजरीवाल यांची पत्नी सुचिता या दोघांनीही याबाबतची माहिती ट्किटरवरून देत आनंद क्यक्त केला आहे.

स्मृती इराणी यांनी जोहर चांगले गुण घेऊन बारावीची परीक्षा पास झाल्याचा मला गर्व आहे. प्रमुख चार विषयांमध्ये त्याला 91 टक्के गुण मिळाले आहेत. अर्थशास्त्रामध्ये 94 गुण घेतल्याचा जास्त आनंद होतोय. ‘मला माफ करा, पण आज मी फक्त आई आहे, असे ‘ट्विट केले आहे.