
सामना ऑनलाईन । हैदराबाद
सहप्रवाशांशी वाद झाल्याच्या रागास्तव एका पोलीस कर्मचाऱ्याने चालत्या बसमध्ये गोळीबार केल्याची घटना हैदराबाद येथे घडली आहे. हा पोलीस आंध्र प्रदेश पोलीस दलाचा कॉन्स्टेबल घटनेनंतर तो फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या पोलिसांच नाव श्रीनिवास असं आहे. तेलंगाणा परिवहन विभागाच्या बसमझून श्रीनिवास प्रवास करत होता. बस सुरू असताना त्याचा सहप्रवाशाशी वाद झाला. त्या वादात श्रीनिवास याने आपली पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला. पण, डोक्यावर बसचं छप्पर असल्याने पिस्तुलातली गोळी छताला भेदत पार झाली. या गोळीबाराचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये खळबळ माजली. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. गोळी चालवल्यानंतर साध्या वेशात असलेला श्रीनिवास बसमधून उतरला आणि गर्दीचा फायदा घेत फरार झाला.
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्याचा शोध जारी केला. श्रीनिवासची चौकशी सुरू करण्यात आली असून नेमका काय वादातून त्याने गोळीबार केला याचा शोध सुरू आहे.


























































