Video – रशियात ‘द बर्निग प्लेन’, विमानाला आग लागून 41 प्रवाशांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

रशियामध्ये प्रवासी विमानाला आग लागून 41 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. एमर्जन्सी लँडींगच्यावेळी विमानाचे गिअर हीट जमिनीवर आदळल्याने विमानाला आग लागली. आग लागली त्यावेळी विमानात 78 प्रवासी होते. त्यापैकी 37 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आग लागताच प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीजण विमानात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी मॉस्कोमधील शेरेमेतयेओ विमानतळावर ही भीषण आग लागली.