पादचारी पुलांवरील छप्पर, जाहिराती काढून टाका; एमएमआरडीएचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पादचारी पूल कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यावर केवळ पादचाऱ्यांचाच नव्हे तर वरच्या छपरांचा आणि जाहिरातींचा भारही वाढला आहे. ती छप्पर आणि जाहिराती तातडीने काढून टाका असे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिले आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अशा 21 पुलांचे बळकटीकरण एमएमआरडीए करणार आहे. त्याचप्रमाणे उड्डाणपुलांखालील परिसरातही बागा फुलवल्या जाणार आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील आठ पादचारी पुलांचे सर्वेक्षण वीर जिजामाता टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटकडून (व्हीजेटीआय) करण्यात येत आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरीलही 13 पादचारी पुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजीव यांनी हे आदेश दिले आहेत.