डब्ल्यूएसकेएफ दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेत महाराष्ट्राला सुयश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। चेन्नई

येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई कराटे अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या कराटेपटूनी शानदार कामगिरी नोंदवत 8 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कास्यपदकाची कमाई केली.

या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व डब्ल्यूएसकेएफचे सेक्रेटरी आणि मुंबईचे अध्यक्ष अजय शहा व तांत्रिक सल्लागार राजेश ठाकूर यांनी केले. या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावणाऱया कराटेपटूंची जपानमध्ये खेळलेल्या जाणाऱया आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंत आयुष शहा, लोचन मोहिते, भरत कुरबा, शिवम गुप्ता, पसूल देवाडिगा, गणेश यादव, हर्षित पुजारी, अफ्रिन खान (सर्व सुवर्णपदक विजेते), सुफिया शेख, विधी कांबळे, असीम शेख (तिघेही रौप्यपदक विजेते) आणि कैफ शेख, नंदराज वाडेकर, हर्ष तृषामत (तिघेही कास्यपदक विजेते) यांचा समावेश आहे.