मुंबईसह महाराष्ट्र तापला, नागरिक हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी |  मुंबई

ऊन चांगलंय तापलं आहे. अंगातून घामाच्या धारा येत आहेत, छत्री- स्कार्फशिवाय घराबाहेर पडता येत नाही. येत्या तीन ते चार दिवसांत अशी परिस्थिती मुंबईसह राज्यभरात कायम राहील. उन्हाचा चटका आणखी वाढणार  असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

गेल्या आठवड्यात बहुतांश ठिकाणी वातावरण अंशतः ढगाळ होते विदर्भ सोडला तर सर्वत्र तापमान सरासरी होते. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांपासून काही अंशी सुटका झाली होती. मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र हळूहळू वातावरण पुन्हा कोरडे होऊ लागले आहे. मुंबईचे तापमान 33 डिग्रीपर्यंत पोचले आहे.  

चंद्रपूर 45.8 डिग्री

  • अकोला, नागपूर, वर्धा या ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी तापमान 40 ते 42 अंशांवर आहे.  त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे
  • येत्या तीन ते चार दिवसांत उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या विदर्भात उष्णतेची लाट आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमान वाढलं आहे.
  • मध्य प्रदेश आणि राजस्थानातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे मराठवाडा आणि विदर्भाचा पारा चढला आहे. चंद्रपूर येथे कमाल8 डिग्री तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथेही तापमानाचा पारा 45 अंशांपुढे आहे.
  • पुणे येथे6 डिग्री तर महाबळेश्वर येथे 33.6 डिग्री तापमानाची नोंद आहे.