
सामना ऑनलाईन, मुंबई
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करून दाखवली. यष्टिरक्षण करीत असताना तो ‘खेळ’ कोणत्या दिशेने चाललाय हे चांगलेच ओळखतो. गोलंदाजांना मोलाच्या टीप्स देतो. मात्र क्रिकेटच्या मैदानावर चाणाक्ष म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीही चुकतो असे म्हटले आहे डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने. महेंद्रसिंग धोनीचे सल्ले बहुतांशी वेळा कामी येत नाहीत, असे तो यावेळी म्हणाला.
महेंद्रसिंग धोनी चुकल्याची घटना खूप वेळा घडलीय. पण तेव्हा आपण याबाबत त्याच्याशी काहीही बोलू शकत नाही. एरव्ही तो शांत असतो. तसेच जास्त काही बोलत नाही. संघाला गरज वाटल्यास दोन षटकांमध्ये आपले मत व्यक्त करतो, असे कुलदीप यादव पुढे म्हणाला.




























































