मुलीचे लग्न थाटामाटात, वऱ्हाडी बैलगाडीतून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलोली

एकुलत्या एक मुलीचे लग्न… लाडात वाढलेल्या मुलीचे थाटामाटात लग्न लावून देण्यासाठी तिच्या वडिलांनी भारी शक्कल लढवली.वऱ्हाडी मंडळींचे स्वागत चक्क बैलगाडीतून करण्यात आले. सध्या आलीशान गाड्या आल्यामुळे बैलगाड्या जवळजवळ इतिहासजमा झाल्या आहेत, पण कोल्हापूरच्या कोलोली गावात मात्र बैलगाडीतूनवऱ्हाड आले.

पोरीचे लग्न वेगळ्या प्रकारे झाले पाहिजे आणि ते सर्वांच्याच लक्षात राहिले पाहिजे अशी इच्छा कोलोली गावातील मारुती श्रीपती जाधव यांची होती. तृप्ती जाधव या एकुलत्या एका मुलीचा विवाह त्यांनी गावातीलच विजय पाडुरंग पाटील या मुलाशी ठरवला. लग्नासाठीवऱ्हाड घेऊन जाण्यासाठी जाधव यांनी बैलगाडीची नामी शक्कल लढवली.