
सामना प्रतिनिधी, मुंबई
यंदाचा पावसाळा हा सर्व मुंबईकरांना कोणत्याही आपत्तीपासून त्रास न होता त्यांचे दैनंदिन जनजीवन सुरळीत राहावे यासाठी महापालिका प्रशासनासह मुंबईतील सर्व यंत्रणांनी योग्य तो समन्वय साधून पावसाळय़ाआधीच कामे करावीत, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी विविध कामांच्या आढावा बैठकीत सर्व यंत्रणांना दिले.
महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात आज विविध यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱयांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस आयुक्त संजय बर्वे, मध्य रेल्वेचे विभागीय रेल प्रबधंक एस. के.जैन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपगनरे) विजय सिंघल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. अश्विनी जोशी,‘बेस्ट’चेउपमहाव्यवस्थापक आर. जे. सिंग तसेच म्हाडा, एमएमआरडीए, नौदल, लष्कर, पश्चिम व मध्य रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, हवामान खाते, विमानतळ प्राधिकारी जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगरे/नागरी संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथक तसेच महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.




























































