बीडच्या चारा छावण्यांमध्ये गोलमाल, पथकाच्या पाहणीत धक्कादायक माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

एकीकडे भीषण दुष्काळामुळे जनावरे मरणासन्न अवस्थेत असताना दुसरीकडे गावागावांत सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये बोगसगिरी करून अधिकारी-कर्मचारी वरकमाई करत आहेत. बीड येथील चारा छावणीच्या तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. या बोगसगिरीप्रकरणी कारवाई करण्यात यावी असे पत्रच देण्यात आले असल्याची माहिती महसूल उपायुक्त विजयकुमार फड यांनी दिली आहे.

80 छावण्यांची पाहणी
दोनच दिवसांपूर्वी आयुक्तांनी उपायुक्त, उपजिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची 20 पथके बीड येथे पाहणीसाठी पाठविली होती. जिल्हाभरात 80 छावण्यांची पाहणी केल्यानंतर जो प्रकार निदर्शनास आला त्याबद्दल पथकांनी आपला अहवाल दिला आहे. यासंदर्भात महसूल उपायुक्त विजयकुमार फड यांनी याबाबतची माहिती दिली. नोंदीनुसार जनावरांची प्रत्यक्ष संख्या खूपच कमी आढळल्याचा गंभीर प्रकार यावेळी समोर आला. छावणीमध्ये दाखल जनावरांची संख्या अडीच हजार होती, मात्र प्रत्यक्षात तेथे सुमारे 500 जनावरे होती असे दिसून आल्याचे ते म्हणाले.