केंद्रात एनडीएचे सरकार, एक्झिट पोलचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली

देशात लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यांतील मतदान पार पडल्यावर आता वेगवगळय़ा टीव्ही चॅनेल आणि राजकीय विश्लेषकांच्या एक्झिट पोलनुसार केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार येईल हे स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वेगवेगळय़ा एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे. तर देशात काँग्रेसची स्थिती सुधारेल तसेच महाआघाडीचाही प्रभाव उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये दिसून येईल. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे सरकार पुन्हा विराजमान होईल, असेही या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झाले. आता गुरुवार, 23 मे रोजी मतमोजणी होईल. रविवारी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यावर सायंकाळी 6 वाजता एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. वेगवेगळय़ा एक्झिट पोलच्या अंदाजानुसार केंद्रात एनडीएचे सरकार सत्तेवर येईल. पण उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ‘एबीपी न्यूज-नेल्सन’च्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशात एनडीएला यंदा 22 जागा मिळतील. 2014 च्या निवडणुकीत एनडीएला 73 जागा मिळाल्या होत्या. पण तरीही देशात एनडीएचे सरकार येईल असे अंदाज सर्व वाहिन्यांवर दाखवले जात आहे.

‘टाइम्स नाऊ’ व ‘व्हीएमआर’च्या अंदाजानुसार तर एनडीएला 306 जागा, यूपीएला 132 तर महागठबंधनला 104 जागा मिळतील.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला फायदा

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला 9 जागांवर फायदा होण्याची चिन्हे आहेत, तर तृणमूलच्या सहा व काँग्रेसच्या दोन जागा कमी होण्याचा अंदाज ‘टाइम्स नाऊ’च्या अंदाजात नमूद केले आहे.

प्रियंका गांधी फॅक्टर

देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी जिवाचे रान केले. त्याचा फायदा काँग्रेसप्रणीत महाआघाडीला होईल असे दाखवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एकही जागा नाही

‘एबीपी न्यूज व नेल्सन’च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात 48 जागांपैकी शिवसेना-भाजप महायुतीला 34 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर ‘टाइम्स नाऊ’ व ‘व्हीएमआर’ने तर महाराष्ट्रात महायुतीला 38 जागा तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला फक्त दहा जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज दिला आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीने मोठी हवा निर्माण केली होती, पण वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज एनडीएला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ‘एबीपी न्यूज-नेल्सन’च्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशात एनडीएला यंदा 22 जागा मिळतील. 2014 च्या निवडणुकीत एनडीएला 73 जागा मिळाल्या होत्या, पण तरीही देशात एनडीएचे सरकार येईल असे अंदाज सर्व वाहिन्यांवर दाखवले जात आहे. ‘टाइम्स नाऊ’ व ‘व्हीएमआर’च्या अंदाजानुसार तर एनडीएला 306 जागा, यूपीएला 132 तर महागठबंधनला 104 जागा मिळतील.

महाराष्ट्रात युतीला यश

‘एबीपी न्यूज’ व ‘नेल्सन’च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात 48 जागांपैकी शिवसेना-भाजप महायुतीला 34 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ‘टाइम्स नाऊ’ व ‘व्हीएमआर’ने महाराष्ट्रात महायुतीला 38 जागा तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला फक्त दहा जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज दिला आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीने मोठी हवा निर्माण केली होती, पण वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

                                                       542-542
                                              निवडणूक निकालांचे अंदाज

 एकूण 543                                                                                बहुमताचा 272

एबीपी न्यूज -नेल्सन

भाजप+                              काँग्रेस+                 महाआघाडी

267                                  127                      148

सी-व्होटर

भाजप +                             काँग्रेस +                  महाआघाडी

287                                  128                            127

जन की बात   

  भाजप +                          काँग्रेस +                     महाआघाडी

  305                                124                              113

टाईम्स नाऊ- व्हीएमआर

भाजप+                           काँग्रेस +                     महाआघाडी

306                              132                                 104

न्यूज नेशन     

भाजप+                          काँग्रेस +                         महाआघाडी

290                               118                                 130

अंदाज किती खरे किती खोटे
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळ बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले होते. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर येईल असे एक्झिट पोलचे अंदाज होते. निकालानंतर भाजपला बहुमत मिळाले. एनडीएला 336 जागांवर विजय मिळाला होता, तर काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावे लागले होते.

सोशल मीडियातून बाहेर पडण्याची वेळ – उमर
सगळेच एक्झिट पोल खोटे ठरू शकणार नाहीत. त्यामुळे टीव्ही बंद करून सोशल मीडियातूनही बाहेर पडण्याची वेळ आलीय, असे टिवट नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

मतदारांची  मन की बात कोणालाच कळू शकत नाही! एक्झिट पोलच्या गोसिपवर विश्वास नाही
एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प. बंगालमध्ये भाजपला तब्बल 9 जागा मिळतील तर तृणमूलच्या 6 आणि काँग्रेसच्या 2 जागा कमी होतील असा अंदाज आहे. मात्र मतदारांची मन की बात कुणालाच कळू शकत नाही, असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे.

अंदाज आणि प्रत्यक्ष
इंडिया टुडे
एनडीए – 261 ते 183
यूपीए –   110 ते 120
इतर –    150 ते 162

सीएनएन आयबीएन
एनडीए – 110 ते 120
यूपीए –    92 ते 102
इतर –    159 ते 181

इंडिया टीव्ही सी व्होटर
एनडीए – 289
यूपीए –   100
इतर –    153

प्रत्यक्षात मिळालेल्या जागा
एनडीए –    336
यूपीए –     60 इतर 147