ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी गरज पडल्यास हातात शस्त्र घ्या- उपेंद्र कुशवाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला उवघे काही तास शिल्लक असताना ईव्हीएमच्या सुरक्षेवरून राजकीय वातावरण तापले आहे. एकेकाळी एनडीए सरकारमधील सहकारी असलेल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाच्या उपेंद्र कुशवाहा यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवली आहे.”मतांच्या रक्षणासाठी गरज पडल्यास हातात शस्त्र घेण्याची वेळ आली तर घ्या, ईव्हीएममध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला तर तो थांबवण्यासाठी आम्ही हातात शस्त्र घेऊ, असे विधान करत हिंसाचाराची धमकी दिली आहे.

कुशवाहा यांनी ईव्हीएमबाबत छेडछाड करण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत जनतेमध्ये तीव्र आक्रोश असल्याचे सांगून, जनाधार डावलण्याचे काम जर कोणी केले तर, हाती शस्त्रे घेऊ असा इशारा त्यांनी दिला. तसेच वेळ पडली तर बिहारच्या जनतेनेही हातात शस्त्र घेऊन संरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही केले.