राज्यात पहिला निकाल जाहीर, बारामतीहून सुप्रिया सुळे विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा बारामती मतदारसंघ सुप्रिया सुळे यांनी राखला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना तिकीट दिले होते. सुरूवातीला सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या तर कांचन कुल यांनी आघाडी घेतली होती. परंतु अखेर निकाल जाहीर झाला असून सुप्रिया सुळे यांनी विजयश्री खेचून आणली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना बारामतीची जागा दिली होती. जानकर यांनी रासपच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही सुप्रिया सुळेंना तगडी टक्कर दिली होती. जानकर जर कमळ चिन्हावर लढले असते तर निकाल वेगळा लागला असता असे काहींचे म्हणने होते. यावेळी भाजपने कुठलीच कसर न सोडता कमळच्या चिन्हावरच कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. परंतु निकाल सुप्रिया सुळेंच्या बाजूने लागला असून तब्बल अडीच लाखहून अधिक मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला आहे.