
सामना ऑनलाईन । जालंदर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंजाबमध्ये उमेदवार निकालानंतर धाय मोकलून रडताना दिसला. हा उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला पण त्याच्या रडण्याचे कारण त्याही पलीकडचे होते. जालंदर मतदारसंघामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱया नितू सुरतनवाला यांना केवळ पाचच मते मिळाली आहेत.
नितू यांच्या कुटुंबात नऊजण असताना त्यांना केवळ पाच मते मिळाली. पराभवापेक्षाही कुटुंबानेच आपल्यावर भरवसा टाकला नाही आणि मत दिले नाही याचा धक्का नितू यांना बसला असून ते काल रडले. ‘तुमचे कुटुंबीयच तुम्हाला पाठिंबा देत नाहीत तर बाहेरील लोक तुम्हाला कसा पाठिंबा देणार’ असा सवाल पत्रकाराने त्यांना केला. या प्रश्नावर नितू यांना रडू कोसळले. आपला पराभव कुटुंबामुळे आणि ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्यामुळे झाला असा आरोप त्यांनी केला. निकालाचा आपल्याला धक्का बसला असून यापुढे कधीच कोणतीही निवडणूक लढवणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांना एकूण 856 मते मिळाली त्यापैकी पाच मते घरातली होती.

































































