
सामना ऑनलाईन । मुंबई
पाच हिंदू पाकिस्तानी नागरिकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. मंत्रालयात त्याचे प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले. यात अमरवातीच्या राणीबाई केसवाणी, शांतीबाई केसवाई आणि अनिता केसवाणी यांना नागरिकत्व देण्यात आले आहे. तसेच जळगावच्या रिटाबाई सिंधी व कोल्हापूरच्या प्रयाणा मुलचंदानी यांनाही हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात आले आहे.गेली वीस वर्ष हिंदूस्थानचे नागरीकत्व मिळण्यासाठी प्रयत्न करत होते.
ज्यावेळी या हिंदुस्थानच्या नवीन नागरिकांना प्रमाणपत्र सुपुर्द केले तेव्हा गृह खात्याचे अतिरिक्त सचिव अमिताभ गुप्ता आणि जळगाचे माजी आमदार गुरुमुख जगवाणी उपस्थित होते. या नागरिकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळावे याठी गुरुमुख जगवाणी प्रयत्न केले होते.
पाकिस्तानातील हिंदु अल्पसंख्यांना हिंदुस्थानी नागरिकत्व देण्यात यावा असा कायदाच केंद्र सरकारने २०१६ साली काढला होता. या कायद्यामुळेच या पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदुंना हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळण्यास सोपे झाले अशी माहिती विभाग अधिकारी दीपक खरात यांनी दिली.




























































