
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
२३ मे रोजी लोकसभेचा निकाला जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३५३ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी त्यांच्या आईला भेटून आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर आई गंगेचे आशीर्वाद घेण्यासाठी ते वाराणसीला रवाना होतील. तशी माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन दिली आहे.
सोमवारी वाराणसीला जाऊन जनतेचे देखील पंतप्रधान मोदी आशीर्वाद घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३५३ जागांवर विजय मिळवला असुन एकट्या भाजपने ३०३ जागांवार यश मिळवले आहे. तर युपीएने ९२ जागांवर विजय मिळवला त्यातील ५२ जागा या काँग्रेसच्या आहेत. शनिवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक असून या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड होईल.






























































