
सामना ऑनलाइन ,नवी दिल्ली
इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱया यंदाच्या विश्वचषकात टीम इंडियाच्या यष्टय़ांमागे असणारा अनुभवी महेंद्रसिंह धोनी कर्णधार विराट कोहलीची आणि संघाच्या यशासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्याने केलेल्या सूचनांचा कर्णधार विराट आणि संघाला निश्चितच लाभ होईल, असे मत सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले.


























































