मुकेश अंबानी यांनी घेतले बद्रीनाथाचे दर्शन; दोन कोटी रुपयांचे दिले दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बद्रीनाथ

रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथला जाऊन बद्रीनाथाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर अंबानी यांनी मंदिर परिसरात फेरफटका मारला आणि भगवद्गीतेच्या पाठाचे श्रवण केले. त्यांनी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिर समितीला दोन कोटी रुपयांचे दानही दिले. दानाच्या या रकमेतून मंदिरातील पूजा अर्चनेसाठी चंदन आणि केसर खरेदी करण्यात येणार आहे. मुकेश अंबानी यांनी वडील धीरुभआई अंबानी यांच्या स्मरणार्थ हे दान दिले आहे.

मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंबानी यांचे स्वागत केले. अंबानी यांनी बद्रीनाथाकडे देशाचे कल्याण आणि विकासासाठी प्रार्थना केली. देवासाठी वापरण्यात येणारे चंदन तामीळनाडूतील जंगलातूनच मागवावे, अशा सूनचाही त्यांनी मंदिर समितीला केल्या आहेत. अंबानी यांनी गेल्यावर्षी कुटुंबासह बद्रीनाथ आणि केदारनाथाचे दर्शन केले होते. त्यांची मुलगी इशा अंबानी हिच्या लग्नापूर्वी आशिर्वाद घेण्यासाठी ते आले होते. 10 मे रोजी बद्रीनाथाचे दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत.