
सामना प्रतिनिधी । पुणे
पुण्यात दिवसभर हॉटेलमध्ये काम करणारा गौरव मधुकर नवरत हा विद्यार्थी 77.23 टक्के गुण मिळवून रात्रशाळेत प्रथम आला. चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) होण्याचे त्याचे ध्येय आहे. गौरव नवरत हा मूळचा कोकणातील रत्नागिरी जिल्हा, चिपळूण तालुक्यातील मजरे गोवळ (नवरतवाडी) येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून घरची अर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्या आईचे नाव संगीता असून त्या गावाकडे घरकाम करून उदरनिर्वाह करतात. गावातच गौरवने दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्याला दहावीत 87 टक्के गुण मिळाले आहेत.























































