कोलकात्यातील मशीदीत महिलांकरीता नमाज पठणासाठी विशेष सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन । कोलकाता

मुस्लिम समाजाचा रमजानचा पवित्र महिना चालू असतानाच मुस्लिम महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोलकता येथील सुप्रसिद्ध मशीद नाखुदा आणि टिपु सुलतानमध्ये आता महिला देखील नमाज पठण करु शकणार आहेत.

इमाम असोसिएशन या संस्थेने दोन मशीदींना पत्र पाठवून महिलांना नमाज पठण करण्यासाठी जागा द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती दोन्ही मशीदीच्या व्यवस्थापनांनी मान्य केली आहे. तसेच विश्राम कक्ष व शौचालयाची देखील सुविधा महिलांसाठी उपलब्ध करून द्यावी असेही या पत्रात म्हटले आहे. बंगाल इमाम असोसिएशनच्या या निर्णयामुळे मुस्लिम महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोलकता येथील या मशिदींमध्ये महिलांसाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे महिला मशीद येऊन देखील महिलांना नमाज पठण करता येणे अवघड होते असे बंगाल इमाम संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद याहिया यांनी सांगितले. शरियातील नियमानुसार महिला देखील नमाज पठण करु शकतात परंतु त्या करीता महिलांसाठी वेगळी आणि सुयोग्य व्यवस्था आवश्यक आहे.

शरिया कायद्यानुसार महिलासुद्धा मशिदीत नमाज पठाण करू शकतात असे इमाम संघटनेचे मोहम्मद याहिया यांनी म्हटले आहे. तसेच कोलकात्यातील मशिदींमध्ये महिलांसाठी योग्य सुविधा नसल्याने त्यांना नमाज पठणासाठी अडचणी येत होत्या असेही त्यांनी नमूद केले.

इमाम संघटनेच्या आदेशानंतर दोन्ही मशीदींच्या प्रशासनाने महिलांच्या नमाज पठणाची व्यवस्था करण्यास सुरूवात केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मशिदीत नमाज पठणाची संधी मिळाल्याने महिलांसाठी ही विशेष पर्वणी ठरणार आहे.