मोदींच्या मंत्रिमंडळात 24 कॅबिनेट मंत्री व 34 राज्यमंत्र्यांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुरुवारी राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. मोदींनी हिंदुस्थानचे 17 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 58 मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 34 केंद्रीय राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळामध्ये 19 नवीन चेहरे आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील सात मंत्र्यांचा समावेश आहे. याच चार जणांना कॅबिनेट मंत्रिपद, तर तिघांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाले आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे –

कॅबिनेट मंत्री – नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सितारामण, रामविलास पासवान, नरेंद्र सिंग तोमर, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, थावरचंद गहलोत, एस. जयशंकर, डॉ. रमेश निशंक, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी, प्रल्हाद जोशी, डॉ. महेंद्रनाथ पांडे, अरविंद सावंत, गिरीराज सिंह, गजेंद्र सिंह शेखावत,

केंद्रीय राज्यमंत्री – संतोष कुमार गंगवार, राव इंद्रजीत सिंह, श्रीपाद नाईक, डॉ. जितेंद्र सिंह, किरण रिजिजू, प्रल्हाद पटेल, आर.के. सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडविया, फग्गन सिंह कुलस्ते, अश्विनीकुमार चौबे, अर्जुन राम मेघवाल, जनरल वी के सिंह, कृष्णपाल गुर्जर, रावसाहेब दानवे, जी. कृष्ण रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, रामदास आठवले, साध्वी निरंजन ज्योती, बाबुल सुप्रियो, डॉ. संजिवकुमार बालियान, अनुराग ठाकूर, सुरेश अंगाडी, नित्यानंद राय, रतनलाल कटारिया, व्ही. मुरलीधरन, रेणुका सिंह, सोम प्रकाश, रामेश्वर तेली, प्रतापचंद्र सारंगी, कैलाश चौधरी आणि देबोश्री चौधरी