दुचाकी आणि टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

कारेगाव जवळ दुचाकी व टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. राजेंद्र रामदास कळसकर (38) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हि घटना रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली आहे.

कामनिमित्ताने राजेंद्र हे कारेगावकडे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. दरम्यान अपघाताची माहिती समजताच तांदळी व कळसकरवाडी परिसरात शोककळा पसरिली. कळसकरवाडी सोसायटीचे माजी चेअरमन रामदास सर्जेराव कळसकर यांचे राजेंद्र हे पुत्र होते.

त्यांच्या दुर्दैवी मृत्यू बदल शिरूर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गदादे,सरपंच गोरख गदादे, घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा.सुभाष कळसकर व ग्रामस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.