वाळू तस्करीत सात वाहने ताब्यात, 10 लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पूर्णा

पूर्णा तालुक्यातील पेनुर लहान येथून मागील दोन ते तीन महिन्यापासून अवैध वाळू उपसा होत होता. स्थानिक मंडळ अधिकारी व तलाठी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे राज्य सरकारचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बूडीत खात्यात जमा होत होता. यासंदर्भात वेळोवेळी वर्तमानपत्रांमध्ये आवाज उठविला होता. परंतु वाळू तस्करांनाविरुद्ध कोणीही कारवाई करण्यास पुढे येत नव्हते. परंतु 2 जूनच्या मध्यरात्री गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी विश्वंभर गावंडे, तहसीलदार श्याम मदनुरकर, गंगाखेडची तहसीलदार स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार, डॉ. निकेतन वाळे, श्रीरंग कदम यांनी तालुक्याचे तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांनी संयुक्तरित्या गोदावरी नदीमध्ये मध्यरात्री धाड टाकली. या दारी मध्ये तब्बल 7 वाहने ताब्यात घेतले. आठ ते दहा मोटारसायकली ताब्यात घेतले असून या सर्वांना सुमार 10 ते साडे दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही सर्व वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. त्यामुळे मागील अनेक दिवसापासून मोकाटपणे वाळू उपसणाऱ्या वाळू तस्करांची धाबे दणाणले आहेत. अजूनही धानोरा (मोत्या) येथील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मागील तीन ते चार महिन्यापासून पूर्णा तालुक्यातील निळकंठेश्वर अर्धापूर, कावलगाव, कावलगाव वाडी, धानोरा (मोत्या), पेनुर लहान या परिसरात गोदावरी नदीचे पात्र जेसीबीद्वारे खोदून अवैध वाळू उपसा करण्याचा धडाका परिसरातील रेती तस्करांनी लावला होता. परंतु या तस्करावर आळा घालण्यासाठी काही स्थानिक कर्मचारी सहकार्य करत नव्हते. त्यामुळे 2 जूनच्या मध्यरात्री गंगाखेडचे अपर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी पूर्णा व पालमच्या तहसीलदा तसेच पोलिसांना सोबत घेऊन मध्यरात्री पेनुर लहान येथील गोदावरी नदीपात्रामध्ये धडक कारवाई सुरू केली. मध्यरात्री २ वाजता तहसीलदार, जिल्हाधिकारी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये दिसतात 200 ते 300 वाहनधारकांनी सैराटपाणे आपली वाहने या दिशेने पडण्याचा सपाटा लावला. तर पेनुर लहान पेनुर मोठा येथील १ हजार नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये रेती. उपसण्यासाठी असलेले साहित्य व ती माणसे सैरावैरा धावू लागली. अचानक पोलिसांनी चारही बाजूंनी घेतल्यामुळे त्यारी तस्करांना पकडणे मुश्कील झाले होते. तर काही वाळू माफीयांनी दिसेल तिकडे ट्रॅक्टर पडण्याचा सपाटा लावला होता. ट्रॅक्टर पळवीत असताना काही जणांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्या सर्वांना जाग्यावरच रोखले तोपर्यंत महसूल प्रशासनाने घटनास्थळाहून 2 टिप्पर ताब्यात घेतली. त्यानंतर विना नंबरचे 5 ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. रात्री 3 वाजेपर्यंत लोकेशनसाठी वापरण्यात येणाNया गोदावरी नदीच्या पात्रातील व आजूबाजूच्या ठिकाणावरील 8 ते 10 मोटारसायकली पथकाने ताब्यात घेतल्या.