
सामना प्रतिनिधी । नगर
शहर पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्ती कामासाठी शनिवारी दिवसभर शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती नगर शहरात रविवारी पाणी पुरवठा होणार नाही. शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासाठी पाणी वितरणाच्या टाक्या भरल्या जाणार नाहीत. परिणामी रविवारी रोटेशननुसार मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको आदी भागात मनपामार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागात रविवारऐवजी सोमवारी पाणी पुरवठा होईल. त्याचबरोबर सोमवारी सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, कापडबाजार, माळीवाडा आदी भागात पाणी पुरवठा होणार नसून येथे मंगळवारी पाणी सोडण्यात येणार आहे.


























































