
सामना ऑनलाईन । मुंबई
पालिकेने ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह पालिकेच्या चार सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. दिघावकर यांची ‘जी उत्तर’ विभागात बदली करण्यात आली आहे.
बदल्यांमध्ये सहाय्यक आयुक्त (रुग्णालये) अलका ससाणे यांची बदली सहाय्यक आयुक्त ई विभागात (भायखळा) बदली करण्यात आली आहे. तर ई विभागाचे अतिरिक्त भार असलेले प्रभारी सहाय्यक नितीन रमेश आर्ते यांची ए विभाग कार्यालयाचे किरण दिघावकर यांच्या जागी बदली करण्यात आली आहे. किरण दिघावकर यांना जी उत्तरची (दादर) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जी उत्तर विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांची एच पूर्व विभागात (सांताक्रुझ-वाकोला) तर एच पूर्क विभागाचे गजानन बेल्लाळ यांची एफ उत्तर विभागात (शिव-वडाळ) बदली झाली आहे. एफ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्यावर मालमत्ता विभागाची जबाबदारी सोपवली आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

























































