बिटकॉईनने व्यवहार केल्यास होणार 10 वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जर तुम्ही बिटकॉईनने व्यवहार करत असाल तर सावधान, असे केल्यास तुम्हाला तुरुंगांची हवा खावी लागणार आहे. केंद्र सरकार डिजिटल करन्सी विधेयक आणणार आहे. त्यानुसार बिटकॉईनने व्यवहार केल्यास 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सी प्रतिबंध आणि डिजिटल करन्सी नियमन 2019 हे विधेयक आणले आहे. या विधेयकात क्रिप्टोकरन्सी बाळगणे हा अजामिनपात्र गुन्हा आहे. बिटकॉईन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी मानली जाते. क्रिप्टोकरन्सी ही अभासी चलन आहे. क्रिप्टोकरन्सीने व्यवहार केल्यास कुठलाच पुरावा राहत नाही. त्यामुळे सरकारी विभागाने या चलनावर बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानंतरच डिजिटल करन्सी सुरू करण्यात येईल.