
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
वादळी वाऱ्यांचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारी शहाळीची दुकानेच उध्वस्त झाली. अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर काही घरांचेही नुकसान झाले आहे. सायंकाळी जोरदार वादळी वारे वाहू लागले. वादळी वाऱ्यांबरोबर किनारपट्टी परिसरात पावसाच्या हलकी सर तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.
जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात डेरवण येथे घरांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी शहरातील खारेघाट रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गणपतीपुळे किनारपट्टीवरचे शहाळी विक्रेते आणि फेरीवाल्यांना वादळाचा तडाखा बसला.



























































