
सामना ऑनलाईन, मुंबई
शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा गुरुवार, 13 जून रोजी वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज लावू नका. त्याऐवजी पर्यावरणासाठी, समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक तसेच युवासैनिक ‘मातोश्री’ निवासस्थानी जातील. आदित्य ठाकरे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.





























































