नीरा-देवधरचे पाणी वळवण्यावरून उदयराजेंचा शरद पवारांवर नाव न घेता निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
udayanraje-bhosale

सामना ऑनलाईन । सातारा

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने बारामतीचे नीरा-देवधरचे पाणी दुष्काळी भागाकडे पुन्हा वळविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे साताऱ्याचे खासदार उदयन राजे भोसले यांनी स्वागत केले आहे. उदयन राजे यांनी घेतलेली ही भूमिका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घरचा आहेर असल्याचे बोलले जात आहे.

कोणाला किती पाणी द्यायला पाहिजे ही तर प्रशासकीय बाब आहे. या प्रशासकीय बाबीचा निर्देश आज 14 वर्षांनंतर निघतो त्याबद्दल वाचून वाईट वाटतं म्हणण्यापेक्षा आज सर्व वर्तमानपत्रांत लिहून आले आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, खंडाळा, फलटण, माळशिरस हे सगळे तालुके पाण्यापासून वंचित तालुके आहेत. एवढी पाण्याची तीव्रता असताना अध्यादेश एवढा उशिरा का निघाला याचा विचार करायला हवा, अशा शब्दात उदयन राजे यांनी नाव न घेता निशाणा साधला आहे.