
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील गायत्री मोबाईल या दुकानाच्या शटरची कडी तोडून अज्ञात चोरट्याने 1 लाख 3 हजार 500 रूपये किमंतीचे मोबाईलसह अन्य साहित्य लंपास केले. अर्जुन परमार यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांचे गायत्री मोबाईल हे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने 82 हजार 500 रुपये किमंतीचे 7 मोबाईल हॅण्डसेट, 4 हजार 600 रुपये किमंतीचे युप्लेक्स ब्ल्युटूथ,1100 रुपयांचा पॉवर बॅंक, 5 हजार रुपये किमंतीचा एलईडी, 10 हजार रूपयांचा सीसीटिव्ही चोरट्याने लंपास केले आहे.






















































