
सामना प्रतिनिधी । मुंबई
विरोधी पक्षांत फोडाफोडी केली नाही तर त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा नेतृत्वावरील विश्वास संपलाय. तुमचे लोक तुमच्या सोबत राहायला तयार नाहीत. त्यांना तुम्हाला सांभाळता येत नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षात फोडाफोडी केल्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर जेरदार ताशेरे ओढले. ‘सरकार आभासी काम करतेय’ अशी टीका करणारे विरोधक आभासातून अद्याप बाहेर आलेले नाहीत. मागील पाच वर्षं मोदींवर आरोप करीत होते. त्यांची जमिनीशी नाळ तुटलेली आहे. जनेतेशी त्यांचं नातं जुळलेलं नाही. म्हणून त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. त्यामुळे आभास सोडून जनतेकरिता काम करून विरोधी पक्षांनी आपली भूमिका पार पाडवी, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांकडून मंत्र्यांवर केवळ आरोप करण्यात आले. मात्र ते कोणताही पुरावा मांडू शकले नाहीत. त्यांनी केवळ गोंधळ घातला. त्यामुळे पुरावे मांडा. हे सरकार त्याला तत्काळ प्रतिसाद देईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर राकते, शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, पदुम मंत्री महादेक जानकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पाणीपुरकठा मंत्री बबनराक लोणीकर, प्रा.डॉ. तानाजी साकंत यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
28 विधेयके चर्चेला
उद्यापासून सुरू होणार्या अधिवेशनात 13 नवीन विधेयके आणि विधानसभेतील प्रलंबित 12, विधान परिषदेतील प्रलंबित 3 अशी एकूण 28 विधेयक चर्चेला येणार आहेत. राज्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने अधिवेशनात दुष्काळाकर चर्चा करण्यात येईल. आतापर्यंत शेतकर्यांच्या थेट खात्यावर 4 हजार 700 कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच 3 हजार 200 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करणे सुरू आहे. प्रधान मंत्री किसान योजनेत राज्यातील 1 कोटी 20 लाख शेतकर्यांचा समावेश असेल. त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांच्या खात्यातही खरिपापूर्वी रक्कम जमा होणार आहे.
राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सादर करणार
विधिमंडळाच्या पाकसाळी अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल. तसेच अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीकरही चर्चा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
धनगर समाजाच्या आश्वासनांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात
विरोधक जे मुद्दे मांडतील त्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर आम्ही देणार. मराठा समाजाच्या आरक्षणाचा घोळ घातला म्हणून विरोधक अरोप करताहेत. पण घोळ कोणी घातला हे सभागृहाने पाहिले आहे. या सरकारने मराठा समाजाच्या मेडिकल ऑमिशन्स पूर्ण केल्या. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला. धनगर समाजाची आश्वासने अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होतील. ज्या समाजाला 15 वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीने फसवले त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम हे सरकार करेल. समाजाच्या हिताचे निर्णय घेतले म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे. हा विजयाचा उन्माद नाही तर विजयाने जबाबदारी वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.























































