विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आयआयटीमधील एका विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून तिला त्रास देणाऱयाला पवई पोलिसांनी अटक केली. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

तक्रारदार ही आयआयटीमध्ये शिक्षण घेते. तीन वर्षांपूर्वी तिला फेसबुकवर मेसेज आला होता. त्याकडे तिने दुर्लक्ष केले. पुन्हा त्या व्यक्तीने तिला मेसेज पाठवले. प्रॅक्टिकल दरम्यान एक जण तिच्याकडे अश्लील नजरेने पाहत असायचा. 2017 मध्ये तक्रारदार याना एक मेसेज आला होता. त्यानंतर तिने त्या व्यक्तीचे अकाऊंट ब्लॉक केले. अकाऊंट ब्लॉक केल्यावरही तो एका मेलवरून तरुणीला मेसेज पाठवायचा. याबाबत तिने आयआयटीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत अटक व्यक्तीला आयआयटीने काढून टाकले होते. अटक व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याला सातारा येथून शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले होते.