
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
17 व्या लोकसभेतील संसदेच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठीबाणा जपत मराठीतून शपथ घेतली. ही शपथ घेतीवेळीचा त्या व्हिडीओ व्हायरल झाला असून सावंत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
@ShivSena खासदार, केंद्रीय मंत्री @AGSawant यांनी संसदेत मराठीमधून शपथ घेतली… pic.twitter.com/dXGM6MZE6U
— Saamana (@Saamanaonline) June 17, 2019



























































