एकतर्फी प्रेमातून माथेफिरु तरुणाने दिली सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
man-arrested-from-vikroli

सामना प्रतिनिधी । ठाणे

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी देणारा एक मजकूर ठाण्यातील विवियाना मॉलच्या भिंतीवर आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी याचा छडा लावला तेव्हा ही चिठ्ठी दहशतवादी संघटनेची नसून एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरु तरुणाने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाण्याच्या विवियाना मॉलच्या भिंतीवर एक दहशतवादी मजकूर लिहिण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले. त्यांनी तातडीने या मजकूरासंदर्भात तपास सुरू केला. या तपासादरम्यान मजकूर लिहिणारा तरुण हा विक्रोळीत राहणारा असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली असता हा दहशतवादी तरुण नसून माथेफिरु असल्याचे समजले. एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने मुलीची बदनामी व्हावी यासाठी मजकूर लिहिला आणि त्यात तिच्या मोबाईल नंबरचा देखील उल्लेख केला होता, अशी महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.