
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्याने मागील चार कर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन ही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात महाराष्ट्राने यश मिळवले आहे. देशाच्या 6.8 टक्के किकास दरापेक्षा राज्याच्या आर्थिक विकास दरात 7.5 टक्के दराने वाढ होत आहे. मात्र सततच्या दुष्काळामुळे कृषी क्षेत्रात राज्याची घसरण होत असल्याचे चित्र आर्थीक पाहणी अहवालातून पुढे आले असून कृषीचा विकास दर 3.1 वरून 0.4 वर आला आहे.
राज्यावरचे कर्जाचे प्रमाण घटले असून स्थूल राज्य उत्पन्नाशी कर्जाचे असलेले प्रमाण हे 16.5 टक्क्यांहून कमी होऊन ते 15.6 टक्के इतके झाले आहे. थेट विदेशी गुंतकणुकीमध्ये महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य राहिले असून 2014-15 ते 18-19 या कालावधीत 3 लाख 99 हजार 901 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली. त्यात मागील चार वर्षातील गुंतवणूकीची टक्केवारी ही 57.93 टक्के इतकी आहे.
























































