
सामना प्रतिनिधी । मुंबई
अवैधरीत्या आणि अनावश्यक शस्त्रक्रिया करून ऊसतोड करणाऱया महिलांची गर्भपिशवी काढणाऱया डॉक्टर आणि रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली. याप्रकरणी राज्यस्तरावर एसओपी अर्थात प्रमाणित कृती समिती स्थापन केली जाणार आहे. या कृती दलात महिला आमदार, स्त्रीरोगतज्ञ आणि आरोग्य विभागाच्या प्रधानसचिवांचा समावेश असेल. ही कृती समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करेल, असे शिंदे यांनी सांगितले.
बीड जिह्यात अवैधरीत्या शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढणाऱया रुग्णालयांविरोधी कारवाईची मागणी करणारा तारांकित प्रश्न शिवसेना सदस्या नीलम गोऱहे यांनी उपस्थित केला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गठीत केलेल्या समितीने केलेला अभ्यास कुठपर्यंत आलाय, अशी विचारणा गोऱहे यांनी केली. तसेच ऊसतोड कामगार महिलांना प्रसूतीची रजा, आरोग्य विमा व अन्य सेवा देण्यासंदर्भात करार करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे गोऱहे म्हणाल्या.
बीडमध्ये अवैध शस्त्रक्रियेबाबत जिल्हा अधिकाऱयांनी स्थापन केलेल्या समितीमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. बॉम्बे नार्ंसग कायद्यानुसार दोषी आढळलेल्या रुग्णालयांची मान्यता रद्द केली जाईल. दोषी डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी रद्द करण्याबाबत शिफारस केली जाईल, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.



























































