अयोध्या हल्ला प्रकरणी चौघांना जन्मठेप; एक निर्दोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अयोध्या

2005 मध्ये अयोध्येवर झालेल्या अतिरेकी हल्ला प्रकरणात आज विशेष न्यायालयाने ‘लश्कर ए तोयबा’च्या इरफान, आशिक इक्बाल उैर्फ फारुख, शकील अहमद तसेच मोहंमद नसीम या चार अतिरेक्यांना जन्मठेपेचे शिक्षा सुनावली. मोहंमद अजीज याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना 20 हजार रुपये दंडही ठोठावला आहे.

5 जुलै 2005 रोजी अयोध्येवर पाच अतिरेक्यांनी भयंकर हल्ला केला. प्रयागराज येथील विशेष न्यायालयात न्या. दिनेश चंद्र यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. चौदा वर्षांनंतर आज न्यायालयाने निकाल दिला. पुराव्याअभावी मोहंमद अजीज याची सुटका करण्यात आली, तर उर्वरित चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.