
सामना प्रतिनिधी । मुंबई
पवई हिरानंदानी गार्डन येथील हायको मॉलमधील पहिल्या मजल्यावरील एका गाळ्याला सकाळी आग लागली. या आगीमुळे मॉलमध्ये धूर पसरला. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी धाव घेतली. परंतु धुरामुळे अग्निशमन दलातील जवान गुदमरला असून त्याच्या हाताला इजा झाली आहे. या जवानाला उपचारासाठी पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले आहे. हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावरील गाळ्याला सकाळी 10.30 वा. आग लागली. काही वेळातच आग पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र या वेळी विक्रोळी अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले देवेंद्र वाल्मीकी कोरडकर धुरामुळे गुदमरले. त्यांना वेळीच हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.



























































