
सामना ऑनलाईन। लखनौ
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये आज गुरुवारी पहाटे वह्राडाची बस नाल्यात पलटली. यात 7 जण बेपत्ता झाले असून अन्य 22 जणांना वाचवण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण 29 जण होते. दरम्यान, चालक मद्य पिऊन वेगात गाडी चालवत होता. पण नशेत असल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व ती कलंडत बाजूने वाहणाऱ्या नाल्यात जाऊन पडली.
गुरुवारी पहाटे लग्नसमारंभ आटोपून पाहुणेमंडळींना घेऊन ही बस बाराबांकीला निघाली होती. पहाटे सगळेजण झोपेत असताना अचानक बस कलंडली व भरलेल्या इंदीरा नाल्यात पलटली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हादरलेल्या नागरिकांच्या किंकाळ्या ऐकून स्थानिकांनी नाल्याच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस, पाणबुडे व बचाव पथक काहीवेळातच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिकांच्या मदतीने 22 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. पण सातजण बेपत्ता झाले आहेत.
दरम्यान चालक मद्यपिऊन बस वेगात चालवत होता. पण नाल्याजवळ येताच त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व बस नाल्यात कोसळली असे या अपघातातून बचावलेल्या नागरिकांनी सांगितले आहे. या अपघाताची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
A vehicle carrying passengers fell in Indira canal in Nagram, Lucknow, today morning. Rescue operations underway. Chief Minister has taken cognizance of the incident and directed the SSP and the SDRF to make all possible efforts for search & rescue of the persons who have drowned pic.twitter.com/pHDfJ39EM3
— ANI UP (@ANINewsUP) June 20, 2019





























































