आजारपणाला कंटाळून पोलीस शिपायाची आत्महत्या  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजारपणाला कंटाळून पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची घटना घडली. विजय बागुल असे मृत पोलिसाचे नाव आहे. त्याच्या पार्थिवावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय हे मूळचे नाशिकचे रहिवासी होते. 2009 मध्ये ते मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले होते. गेल्या चार वर्षांपासून ते दिंडोशी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावर उपचार सुरू  होते. उपचार सुरू असूनही त्यांना काहीच फरक जाणवत नव्हता. त्यामुळे ते प्रचंड त्रस्त होते.

आजारपणाला कंटाळून त्यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती समजताच स्थानिक रहिवाशांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विजय यांच्या अपघाती मृत्यूची माहिती समजताच दिंडोशी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. विजयच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.