
सामना प्रतिनिधी, श्रीरामपूर
- राज्यभरात 1 लाख शाखा उभारण्याचं शिवसेनेचं लक्ष्य
- शेतकऱ्यांना, गरीबांना मदत करणाराच खरा मावळा- उद्धव ठाकरे
- शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून कुणी मावळे होत नाहीत.
- अयोध्येत राममंदिर होणारच
- शेतकऱ्यांचे हक्क मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, उद्धव ठाकरे यांचं आश्वासन
- आज शेतकरी कृषी विभाग अधिकारी आणि विमा कंपनी यांच्यामध्ये भरडला जातोय. पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवू नये म्हणून सरकारच्या योजना तळागाळापर्यंतच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला हव्यात. यासाठी संपूर्ण राज्यात मदत केंद्र सुरू झाली पाहिजेत.- उद्धव ठाकरे
- शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे- शिवसेना पक्षप्रमुख
- काल देखील संभाजीनगरमध्ये या अशाच मदतकेंद्राला भेट दिली. नगर-नाशिकमध्ये भेट दिली आणि या सगळ्या गोष्टी आपण करतोय ते केवळ सहा शेतकरी अडचणीत आहे म्हणून आणि म्हणून. जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा देखील त्यांच्या मुलाबाळांच्या लग्न शेतकऱ्यांना योजनेमधून हजारो लोकांचे लग्न झाली. उद्धव ठाकरे
- शिवसेनेने आपल्या सुखादुःखामध्ये धाव घेण्याचे काम केलं आहे. गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी संभाजीनगरच्या बाजूला जालना जिल्ह्यामध्ये चारा छावण्यातील शेतकरी असतील, चारा असेल, त्या जनावरांना पिण्याचे पाणी असेल, शेतकऱ्यांना आदरणीय बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेतून हजारो लोकांना अन्नधान्याचं वाटप करण्याचे काम केलं गेलं – उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
- श्रीरामपूर येथे उद्धव ठाकरे मेळाव्याला पोहोचले
- शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नतमस्तक
- या शेतकऱ्यांमध्ये गणेश आप्पासाहेब वडघुले राहणार शिरसगाव, गिरीधर किसनराव हासणे राहणार माळवडगाव, भाऊसाहेब परशुराम बांगरे राहणार उंदिरगाव, विष्णुपंत एकनाथ खंडागळे राहणार टाकळीभान, सुभाष आप्पासाहेब पठारे राहणार कारेगाव, यांचा समावेश आहे.

- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामपूर येथे पिक विमा केंद्र भेट दिली यावेळी पाच शेतकऱ्यांचे त्यांनी संवाद साधला.
- या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वांना उद्धव ठाकरे यांच्या आगमनाची प्रतीक्षा आहे.
- लवकरच उद्धव ठाकरे यांचं मेळाव्यात आगमन होणार आहे.
- नगर जिल्ह्यामध्ये रविवारी श्रीरामपूर येथे मेळावा होणार आहे. श्रीरामपुर नेवासा रोडवरील इच्छामणी मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी पिक विमा केंद्रास भेट देणार आहेत व त्यानंतर शेतकरी संवाद मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
- या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे तसेच त्यांच्या इतर अडीअडचणी सुद्धा सोडवल्या पाहिजे ही भूमिका घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या शेतकरी संवाद मिळावे सुरू केले आहेत.
- शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविवार दिनांक 23 जून रोजी उद्धव ठाकरे हे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.






























































