क्षीरसागरांनी केली माजलगाव धरणाची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड शहराला बँक वॉटर योजनेच्या माध्यमातून बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणाची पाहणी केली. शहराला पाणी पुरेल अडचण आली तर जायकवाडीतून पाणी सोडावे लागेल. जनतेने घाबरण्याचे काम नाही. विरोधक मात्र नैसर्गिक आपत्तीचे भांडवल करत असल्याची खंत मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी व्यक्त केली

भीषण दुष्काळाच्या पार्शवभूमीवर पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. शहराला या पाणी टंचाईचा कमी जास्त प्रमाणात फटका बसत आहे. आज जयदत्त क्षीरसागर यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धरणातील पाणीसाठा बीडसाठी पुरेसा आहे, अडचण निर्माण झाली तर जायकवाडी मधून पाणी सोडावे लागेल हा शब्द मुख्यमंत्र्याच्या दरबारात टाकला आहे. पाणी कमी पडणार नाही ही खात्री व्यक्त करत नैसर्गिक आपत्तीचा कणखरपणे मुकाबला केला आहे, मात्र विरोधक या संकटाचे भांडवल करत असल्याची खंत व्यक्त केली. विरोधक टीका करत असले तरी मी जनतेशी बांधिलकी ठेवणार आहे. जनतेचे हित आणि काळजी बाळगणे हे माझे कर्तव्य समजतो असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. या वेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आदी उपस्थित होते.