बीड जिल्ह्यात पावसाचे पाणी चारा छावणीत घुसले, पशुधन हायवे वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बीड

रविवारी मध्यरात्री बीड जिल्ह्यातील दहा तालुक्यात पावसाने जोर दाखवला. काही भागामध्ये पाऊस चांगला झाला. पावसाचे पाणी जनावरांच्या छावण्यामध्ये घुसले. छावणीत पाणी झाल्याने जनावरे हायवेवर उतरले. सोमवारी दिवसभर या जनावरांची देखभाल हायवेवरच करावी लागली.

बीड जिल्ह्यामध्ये रविवारी मध्यरात्री पावसाने काही भागाला झोडपले. पावसाचे पाणी छावण्यांमध्ये घुसले गेले. बीड-नगर या मार्गावर अंमळनेर-धामणगाव परिसरात असलेल्या छावण्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने जनावरांची अडचण निर्माण झाली. या जनावरांना शेतकऱ्यांनी बीड-कल्याण या राज्यमार्गावर बांधून त्यांची व्यवस्था केली. जनावरांची छावणी आता बीड-कल्याण या मार्गावर उभारली गेली आहे. सर्वत्र पाणी झाल्याने जनावरांना डांबरी रस्त्यावर आणावे लागले. हा मार्ग नगरला जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने मोठी वाहतूक या मार्गावर असते आणि त्यातच जनावरे रस्त्यावर असल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.