रोहितला बाद दिल्यावरून वाद, तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

मॅनचेस्टरमध्ये हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीजच्या लढतीत तिसऱ्या पंचांच्या एका निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. टीम इंडियाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माला तिसऱ्या पंचांनी बाद दिले. यावेळी मैदानातील प्रेक्षकांसह रोहितच्या पत्नीला देखील आश्चर्याचा धक्का बसला.

हिंदुस्थानच्या डावातील सहाव्या षटकात वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज केमार रोचचा चेंडू रोहितच्या बॅट आणि पॅडला घासून गेला. यष्टीरक्षक शाई होपने झेल घेत बाद असल्याची अपिल केली, परंतु मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. वेस्ट इंडीजने डीआरएस घेतला तेव्हा चेंडू बॅटला की पॅडला लागून गेला हे स्पष्ट होत नव्हते, परंतु तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद ठरवले. हा निर्णय थोडा वादग्रस्त ठरला. रोहितला बाद ठरवल्यानंतर सोशल मीडियावर तिसऱ्या पंचांविरोधात मोहीम उघडण्यात आली.